भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियांनी आता राजकारणात उतरले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी दिल्लीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. 44 वर्षीय मोंगिया 2003 च्या विश्वचषक संघाचा एक भाग होते, ज्या संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. मोंगियाने मेन इन ब्लूसाठी 57 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 27.95 च्या सरासरीने 1,230 धावा केल्या आहेत. फॉर्मेटमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 159 होती आणि त्यांनी मार्च 2002 मध्ये गुवाहाटी येथे झिम्बाब्वेविरुद्ध ही खेळी खेळली होती. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे.
T20 सामना खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटर
परदेश दौऱ्यावर हा डावखुऱ्या फलंदाज मोंगियांच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. मोंगिया हे टी-20 सामना (T-20 Match) खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. हे फार लोकांना माहीत नसेल. 2004 मध्ये इंग्लंडच्या काउंटी क्लब लँकेशायरकडून खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. त्या वर्षी, मोंगियांनी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळले. त्यांनी लीसेस्टरशायरचे प्रतिनिधीत्वही केले आहे.
2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे संघात पदार्पण
मोंगियांनी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पहिले अर्धशतक झळकावले. 2002 मध्ये, त्यांच्या पदार्पणाच्या जवळपास एक वर्षानंतर, त्यांनी पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि त्यांना झिम्बाब्वेविरुद्ध सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
2003 क्रिकेट विश्वचषक संघात VVS लक्ष्मणची जागा घेतली
व्हीव्हीएस लक्ष्मणच्या जागी मोंगियांना 2003 क्रिकेट विश्वचषक संघात स्थान मिळाले. मात्र, खराब कामगिरीमुळे या डावखुऱ्या फलंदाजाला एप्रिल 2005 मध्ये संघातून वगळण्यात आले. मोंगियांना सप्टेंबर 2006 मध्ये मलेशियामध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिरंगी मालिकेतही संधी मिळाली आणि त्यांनी अंतिम गट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 68 धावांची खेळी केली.
आयसीएलमध्येही खेळले, चित्रपटातही काम केले
भारताच्या हा माजी क्रिकेटपटू बागी इंडियन क्रिकेट लीग (ICL) मध्ये चंदीगड लायन्सकडून खेळला. इथेच त्याची कारकीर्द संपली. विशेष म्हणजे बीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर बंदी घातली होती. 2019 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मोंगियांनी कबाब में हड्डी या चित्रपटात काम केले. मात्र, हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.