india won champions trophy  Saam Tv
Sports

Champions Trophy: हातात तिंरगा, टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष,VIDEO

Champions Trophy Celebration: संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर अखेर भारताने दमदार कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकावला आहे. या आनंदात महाराष्ट्रात ठिकठिकाणी धुमधडाक्यात जल्लोष करण्यात आले.

Omkar Sonawane

भारतीय संघाने तब्बल बारा वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफी ला गवसनी घातली आहे. तसेच न्यूझीलंडला सपाटून आपटले असून भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरले आहे. या संपूर्ण विजयामुळे भारत विजयाने दुमदुमून गेला आहे. रोहित शर्माच्या चाणक्य नेतृत्वामुळे भारताने न्युझीलँडला 251 धावात रोखले. तसेच भारतीय संघाने विजयासाठी 252 धावांचा पाठलाग करत न्युझीलँडला घरचा रस्ता दाखवला आहे

भारताने २५२ धावांचे आव्हान सहज पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या अभूतपूर्व विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. मावळच्या शिरगाव येथे भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी मोठ्या पडद्यावर स्क्रीन लावण्यात आली होती, जिथे शेकडो लोकांनी एकत्र येत सामना पाहिला. सामना संपताच विजयाच्या आनंदात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

पुण्यातील मावळगाव, ठाण्यातील पाचपाखाडी, आणि नागपूरमधील लक्ष्मी भवन चौक येथे देखील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. हातात तिरंगा घेऊन 'भारत माता की जय'च्या घोषणा देत चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. धुळ्यामध्येही नागरिकांनी चौकाचौकात फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

भारतीय संघाच्या या दैदिप्यमान विजयानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून, भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

SCROLL FOR NEXT