cricket can be included in olympics after 128 long years in los angeles olympics Saam tv news
Sports

Cricket In Olympic: तब्बल 128 वर्षांनी क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार!लॉस एंजेलेसमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

Cricket In 2028 Los Angeles Olympics: ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट परतणार आहे

Ankush Dhavre

Cricket In 2028 Los Angeles Olympics:

नुकताच आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं. आता भारतीय संघ ऑलिम्पिकमध्येही खेळताना दिसून येऊ शकतो. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत फुटबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉलसह क्रिकेटचा समावेश केला जाऊ शकतो.

असा दावा द गार्जियनने केला आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. या बैठकीत लॅक्रोस आणि स्क्वाशचा देखील ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.

यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये केवळ १ वेळेस क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही संघांमध्ये सुवर्णपदकाची लढत रंगली होती. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती.

या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाऊ शकते. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास या खेळाची लोकप्रियता आणखी वाढेल. तसेच हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. या स्पर्धेत पाच संघ सहभागी होऊ शकतात. हे पाच संघ आयसीसीच्या क्रमवारीनूसार ठरवले जाऊ शकतात. (Latest sports updates)

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, लॉस एंजेलेस आणि ब्रिसबेन ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला तर, प्रसारण हक्कातून मिळणारी कमाई ही १५० मिलियन पाऊंडच्या पुढे जाऊ शकते. ही कमाई क्रिकेटचा फॉरमॅट आणि भारतीय संघ किती सामने खेळणार यावर अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

४,५०० लिटर डिझेलचा साठा पाहून पोलीसही चक्रावले; मुंबईत मोठी कारवाई

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT