Cheteshwar Pujara Saam Tv
Sports

IND VS AUS nd Test: अनलकी पुजारा! १०० व्या कसोटीत शून्यावर बाद होताच झाली नकोशा विक्रमाची नोंद

हा त्याच्या कसोटी कारकिर्दतील १०० वा सामना आहे. मात्र या महत्वाच्या सामन्यात त्याच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test Cheteshwar Pujara: बॉर्डर - गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे.

हा सामना भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वेर पुजारासाठी अतिशय खास आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दतील १०० वा सामना आहे. मात्र या महत्वाच्या सामन्यात त्याच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Latest Sports Updates)

चेतेश्वर पुजारा या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी अशी आशा व्यतक केली गेली होती की, या डावात तो मोठी खेळी करणार. मात्र या डावात तो ७ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला.

यासह तो कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत असताना,शून्यावर बाद होणारा आठवा फलंदाज ठरला आहे. या यादीत दिलीप वेंगसरकर आणि कोर्टनी वॉल्श सारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.

१०० वा सामना खेळत असताना शून्यावर बाद होणारे फलंदाज

दिलीप वेंगसरकर

ॲलन बॉर्डर

कोर्टनी वॉल्श

मार्क टेलर

स्टीफन फ्लेमिंग

ब्रेंडन मॅक्युलम

ॲलिस्टर कुक

चेतेश्वर पुजारा*

तसेच १०० व्या कसोटीत शून्यावर बाद होणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत दिलीप वेंगसरकर अव्वल स्थानी आहेत.

चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. मात्र त्याला गेल्या काही वर्षांपासून हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. २०२० पासून त्याची कामगिरी पाहिली तर त्याला केवळ १ शतक झळकावता आले आहे.

हे शतक त्याने २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत झळकावले होते. त्याने २०२० पासून ते आतापर्यंत एकूण १२५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT