Chetan Sharma Saam Tv
Sports

Chetan Sharma Resign: स्टिंग ऑपरेशनमुळे पडली चेतन शर्मांची विकेट! चीफ सिलेक्टर पदावरून दुसऱ्यांदा झाली सुट्टी

झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे अडचणीत आले होते.

Saam TV News

Chetan Sharma Resign: गेल्या काही दिवसांपासून चेतन शर्मा हे नाव प्रचंड चर्चेत आहे. झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे अडचणीत आले होते. या स्टिंग ऑपरेशननंतर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. दरम्यान चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनाम्याचा अर्ज बीसीसीआयचे सचिव जय शाहकडे पाठवला होता. हा अर्ज जय शाह यांनी स्वीकारला आहे. झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली, सौरव गांगुली, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. (Latest Sports Updates)

चेतन शर्मा यांना पदावरून काढण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरी नंतर देखील चेतन शर्मा यांना आपल्या पदावरून काढून टाकण्यात आले होते. चेतन शर्मा यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

केले मोठे खुलासे..

झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक मोठ मोठे खुलासे केले होते. त्यांनी विराट आणि सौरव गांगुली यांच्यातील कॅप्टनसीवरील वादावर मोठा खुलासा केला होता. तसेच खेळाडूंची निवड कशी होते,याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT