BCCI Saam TV
Sports

BCCI: नव्या निवड समितीची नियुक्तीच नाही; श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघ निवड कोण करणार? दुखापतीमुळे रोहित संघाबाहेर?

टी ट्वेंटी विश्वचषकानंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती, तर नवीन निवड समितीही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Team India Selction For Siries Vs Srilanka: बांग्लादेश दौऱ्यानंतर टीम इंडिया संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने नववर्षाची सुरूवात करेल. श्रीलंका संघाच्या या भारत दौऱ्यामध्ये श्रीलंका संघ तीन टी ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या टी ट्वेंटी संघाची आज निवड होणार असून ही निवड कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती, आणि नवीन समिती स्थापन करण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे संघ निवड कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकातील (T20 World-cup) खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. अशावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन निवड समिती नियुक्त करण्यासही वेळ लागणार असल्याने जुनी म्हणजेच चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच संघ निवड करु शकते.

याआधी बीसीसीआयने रणजी ट्रॉफीमधील दुसऱ्या फेरीतील सामन्यांवर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीला लक्ष ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.

भारत आणि श्रीलंका (Srilanka) दौरा तीन जानेवारीपासून सुरू होत असल्याने कमीतकमी तीन दिवस आधी संघ एकत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबरपर्यंत निवडलेला संघ मुंबईमध्ये जाणे गरजेचे आहे. अशावेळी जुनी निवड समितीच २५ ते २६ डिसेंबरपर्यंत संंघ निवडू शकते.

दरम्यान, श्रीलंका दौऱ्याआधी रोहित शर्माच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिकेलाही मुकावे लागले होते. त्यामुळे रोहितच्या खेळण्याबद्दल शंका आहे. रोहितला संघाबाहेर राहावे लागल्यास हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका; तस्करांकडून गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला

School Reopen: मोठी बातमी! राज्यातील शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर

Petrol Crisis: राज्यात पेट्रोलचा काळाबाजार! किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री, 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यात १८ जूनला २००० रुपये जमा होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा वनडे मालिका खेळणार का? फिटनेसबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT