GT vs CSK IPL Match Saam tv
Sports

GT vs CSK IPL Match: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची झुंजार खेळी, शतक हुकलं; चेन्नईचे गुजरातला १७९ धावांचे आव्हान

आजपासून आयएपीलचा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायट्न्स या दोन्ही संघात सुरू आहे.

Vishal Gangurde

Gujarat vs Chennai IPL Match: आजपासून आयएपीलचा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायट्न्स या दोन्ही संघात सुरू आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या संघाने गुजरातला १७९ धावांचे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कॉनवे १ धावावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.

मोईन अलीने दुसऱ्या विकेटसाठी ३६ धावा कुटल्या. राशिद खानने आठव्या षटकात बेन स्टॉक्सला बाद केले. त्यानंतर गायकवाडने अंबाती रायडूसोबत ५१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर १३ व्या षटकात रायडू बाद झाला.

तर अठराव्या षटकात ९२ धावांवर ऋतुराज बाद झाला. तर अल्जारीने रविंद्र जडेजाला १ धावावर बाद केले. तर धोनीने ७ चेंडूत १ षटकार आणि १ चौकारच्या मदतीने १४ धावा कुटल्या. तर मिशेल १ धावा करून बाद झाला. तर चेन्नई २० षटकाअखेर गुजरातला १७९ धावांचे आव्हान दिले.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची तुफानी खेळी

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पहिल्याच सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची जोरदार फडकेबाजी दिसली. ऋतुराजचं शतक मात्र अवघ्या 8 धावांनी हुकलं. ऋतुराजने 92 धावांची तुफानी खेळी केली. मात्र जोसेफच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

ऋतुराजने 184 च्या सरासरीने अवघ्या 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने 9 षटकार आणि 4 चौकार ठोकले. अल्झारी जोसेफच्या फुल टॉस बॉलवर शुभमन गिलने त्याचा झेल टिपला.

जोसेफने फेकलेला बॉल ऋतुराजच्या कमरेजवळ होता. त्यामुळे अम्पायरला आधी नो बॉल आहे का असा संशय होता. त्यावेळी अम्पायरनी रिव्ह्यूमध्ये नो बॉल तपासला. मात्र तो नो बॉल नसल्याने ऋतुराजला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

SCROLL FOR NEXT