pakistan cricket team saam tv news
Sports

ENG vs PAK: बाय,बाय पाकिस्तान.. ! PAK चा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडताच नेटकऱ्यांनी घेतली फिरकी; भन्नाट मीम्स व्हायरल

Pakistan Viral Memes: पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडताच भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

Ankush Dhavre

Pakistan Viral Memes:

पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिकस्तानला सेमीफायनल गाठण्याची शेवटची संधी होती. मात्र या सामन्यातील नाणेफेक होताच पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप सेमीफायनमधून बाहेर पडला.

कारण पाकिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून इंग्लंडला मोठ्या फरकाने हरवायचं होत. मात्र असं होऊ शकलेलं नाही. दरम्यान पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हे आव्हान ६.५ षटकात पूर्ण करायचं होतं. ६.५ षटक पूर्ण होताच पाकिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला.

दरम्यान पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. (Latest sports updates)

इंग्लंडचा जोरदार विजय..

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३३७ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली.

तर जो रुटने ६० धावांचे योगदान दिले. जॉनी बेअरस्टो ५९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलमान अली आगाने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली.

तर कर्णधार बाबर आझम अवघ्या ३८ धावा करत माघारी परतला. पाकिस्तानला या सामन्यात ९३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडचा संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT