Social media reactions on Rohit Sharma SAAM TV
Sports

Social media reactions: भावा, तू निवृत्ती घे आता...! 'फ्लॉप शो'नंतर चाहत्यांनी रोहित-विराटला केलं ट्रोल

Social media reactions on Rohit Sharma: चौथ्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेलाय. भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करण्यात आली होती. मात्र रोहित अवघ्या ९ रन्सवर बाद झाला.

Surabhi Jayashree Jagdish

मेलबर्नमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट खेळवण्यात येतेय. बॉर्डर - गावस्कर सिरीजमधील या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेलाय. भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करण्यात आली होती. मात्र रोहित अवघ्या ९ रन्सवर बाद झाला.

एकीकडे टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सतत निराशेचा सामना करावा लागतोय. तर सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रोहितचा फलंदाजीचा फॉर्म. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्येही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. जिथे मेलबर्न टेस्टमध्ये भारताच्या विजयासाठी त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती पण या सामन्याच्या दोन्ही डावात तो स्वस्तात बाद झाला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३४० रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माकडून फलंदाजीतील महत्त्वाचं योगदान अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. रोहित काही वेळ क्रीजवर टिकून राहण्यात यशस्वी ठरला पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने माघारी धाडलं.

या सामन्याच्या पहिल्या डावातही रोहित काही विशेष करू शकला नाही आणि त्याने केवळ 3 धावा केल्या. सध्याच्या सिरीजमध्ये रोहितने आतापर्यंत पाच डावांत केवळ 31 रन्स केले आहेत. त्याच्या सततच्या खराब फॉर्ममुळे चाहतेही नाराज झालेत. मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या डावात फ्लॉप झाल्यानंतर रोहितने निवृत्ती घ्यावी असं चाहत्यांचं म्हणणं आहे. याशिवाय रोहितला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं आहे.

दरम्यान रोहित शर्मासोबत विराट कोहलीला देखील या सामन्यात फारसा चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे या दोघांनी मिळून निवृत्ती घ्यावी असं सोशल मीडियावर बोललं जातंय. यावेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Happy Retirement असं ट्रेंड होत असून यामध्ये रोहित आणि विराटवर टीका करण्यात येतेय.

2024 च्या सुरुवातीला रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या सिरीजमध्ये 455 रन्स केले होते. ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश होता. टेस्ट क्रिकेटमध्ये तो आपली भक्कम पकड कायम ठेवेल, असं त्यावेळी वाटत होतं. मात्र बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

रोहित शर्मा निवृत्त होणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर रोहितच्या टेस्ट कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जातायत. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

Leopard : ४ पाय कापलेले, १८ नखे गायब, ऊसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह, साताऱ्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Shocking: विद्यापीठात रक्तरंजित थरार! परीक्षेदरम्यान अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT