Brazil star neymar jr will play navi mumbai dy patil stadium for mumbai city fc vs al hilal match AFC Champions League  saam tv news
Sports

Neymar : ब्राझीलचा स्टार नेमार खेळणार मुंबईत; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या

Neymar News In Marathi: मुंबईकरांनो ही संधी चुकवू नका.

Ankush Dhavre

Neymar News In Marathi:

ब्राझीलचा स्टार नेमार हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. भारतातही त्याचे लाखो फॅन्स आहेत. त्याला खेळताना पाहणं हे अनेकांच्या बकेटलिस्टमध्ये असेल. आता हे स्वप्नं लवकरच सत्यात उतरणार आहे. यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करून परदेशात जाण्याची आणि तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. कारण हा जगप्रसिद्ध भारतात खेळण्यासाठी येणार आहे. (Neymar JR)

नेमार लवकरच फुटबॉल सामना खेळण्यासाठी नवी मुंबईत दाखल होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर AFC Champions League स्पर्धेचा सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई सीटी एफसी आणि अल हिलाल या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे.

हा सामना ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठीच्या तिकीटांच्या विक्रीची सुरुवात २९ सप्टेंबर पासून होणार आहे. सकाळी ११ वाजता तिकीटांची प्री बुकिंग सुरु होणार आहे.

यापूर्वी हा सामना पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी स्टेडियमवर होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार आहे. (Latest sports updates)

अल हिलालसोबत केलाय करार..

पॅरीस सेंट जर्मन संघाला पाठ दाखवत नेमारने सौदीतील प्रसिद्ध क्लब अल हिलाल संघात प्रवेश केला आहे. अल हिलालने नेमारसोबत २ वर्षांचा करार केला आहे. त्याला २ वर्षांसाठी कोटीहुंन अधिकची रक्कम मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT