team india twitter
Sports

Boxing Day Test: बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय? काय सांगतो इतिहास?

Boxing Day Test History: बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास काय सांगतो, बॉक्सिंग डे म्हणजे काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय खास असणार आहे. कारण हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना, हा बॉक्सिंग डे नेमका काय प्रकार आहे? बॉक्सिंग डे शब्द कुठून आला? जाणून घ्या.

बॉक्सिंग डे म्हणजे काय?

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये ख्रिसमसच्या वेळी बॉक्सिंग डे साजरा केला जातो. अशी धारणा आहे की, २५ डिसेंबरला सुट्टी न घेता काम करणाऱ्यांना २६ डिसेंबरला सुट्टी आणि गिफ्ट दिले जाते. त्यामुळेच २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असं म्हणतात. या दिवसाची सुरुवात २६ डिसेंबरपासून होते.

पहिला बॉक्सिंग डे सामना केव्हा खेळला गेला होता.

बॉक्सिंग डे कसोटीला खूप जूना इतिहास आहे. पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना १९५० मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान खेळला गेला होता.

केवळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड नव्हे, तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्येही बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जातो. मेलबर्नला बॉक्सिंग डे कसोटीचा खूप जूना इतिहास आहे. कारण पहिला वहिला बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा थरार मेलबर्नमध्ये रंगला होता.

कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

भारतीय संघाने आतापर्यंत ९ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाने १९८५ मध्ये पहिला बॉक्सिंग डे खेळला होता. या सामन्याचा निकाल लागला नव्हता. हा सामना ड्रॉ राहिला होता. या ९ पैकी भारतीय संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

SCROLL FOR NEXT