australia team  saam tv
Sports

Ind vs Aus: मालिकेदरम्यान आली मोठी बातमी! AUS संघातील 'या' प्रमुख गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानवार पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला.

या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मात्र अंतिम कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाकडे ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. (Latest sports updates)

या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा..

ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज ट्रेंट कॉपलँडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. त्याला ऑस्ट्रेलिया संघाकडून केवळ ३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. अवघ्या १७ दिवसात त्याची कारकीर्द संपुष्ठात आली. त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना ३ कसोटी सामन्यांमध्ये ६ गडी बाद केले होते. हे ३ सामने २०११ मध्ये श्रीलंका संघाविरुध्द झाले होते.

ट्रेंटने ट्विट करत निवृत्ती घेत असल्याची बातमी दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की ,'मी क्रिकेटचे हे हंगाम सुरु होण्यापूर्वीच निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. माझं वय आता ३७ वर्ष होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ही निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे. युवा खेळाडूंनाही संधी मिळेल. मी क्रिकेटमधून जे काही मिळवलं त्याचा मला अभिमान आहे. या प्रवासात मला माझ्या कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केलं,'

अशी राहिली कारकीर्द..

ट्रेंटला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली. त्याने ११२ सामन्यांमध्ये ४१० गडी बाद केले. तर ३९ लिस्ट -ए सामन्यांमध्ये त्याने ४१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास

"ओल्ड मॉन्क ही 'रम' नाहीच!" FSSAI चा बॉम्बे हायकोर्टात मोठा दावा; मद्यप्रेमींना आश्चर्याचा धक्का

Maharashtra News Live Update: भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

High BP During Pregnancy: प्रेग्नेसीमध्ये बीपी किती असावा? उच्च रक्तदाब वाढल्यास शरीरात दिसतात 5 गंभीर लक्षणे

जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदाराच्या पुत्रासह ७ नेत्यांची हाकलपट्टी; एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT