rohit sharma  yandex
Sports

Rohit Sharma Retirement: रोहित कसोटीतून निवृत्त केव्हा होणार? समोर आली मोठी अपडेट

India vs Australia 4th Test, Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान तो निवृत्ती केव्हा घेणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.

या डावात त्याला अवघ्या ३ धावा करता आल्या आहेत. यासह संपूर्ण मालिकेत त्याला अवघ्या २२ धावा करता आल्या आहेत. हा फ्लॉप शो पाहता, फॅन्स आता रोहितने निवृत्ती घ्यावी अशी मागणी करू लागले आहेत.

रोहित निवृत्ती घेणार?

भारतीय संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आणखी एक सामना खेळायचा आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ काही महिने तरी कसोटी मालिका खेळणार नाहीये. जर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला तर, भारतीय संघ जूनमध्ये मैदानात उतरेल. त्याआधीच रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो.

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर सध्या मेलबर्नमध्येच आहेत. लवकरच रोहितच्या निवृत्तीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

केव्हा घेऊ शकतो निवृत्ती?

रोहितची निवृत्ती हे भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. भारतीय संघाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची संधी आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला दोन्ही कसोटीमध्ये पराभूत करावं लागणार आहे.

जर भारतीय संघाने ही मालिका जिंकली, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचू शकले नाहीत, तर रोहित याच मालिकेनंतर कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो. मात्र जर फायनलमध्ये प्रवेश केला, तर हा फायनलचा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT