team india saam tv news
Sports

IND vs ENG: मोठी बातमी! KL Rahul सह प्रमुख खेळाडू संघातून बाहेर; दुसऱ्या कसोटीसाठी या ३ खेळाडूंना भारतीय संघात स्थान

Team India Squad: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ३ नवख्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं आहे.

Ankush Dhavre

Team India Squad For India vs England 2nd Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. रविंद्र जडेजा आणि संघातील मुख्य फलंदाज केएल राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहेत.

बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटलं की,'हैदराबाद कसोटीतील चौथ्या दिवशी रविंद्र जडेजाला स्नायू खेचण्याचा त्रास जाणवला होता. तर केएल राहुलही दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेडिकल टीम दोघांवर लक्ष ठेऊन आहे.'

या ३ खेळाडूंना मिळाली संधी..

रविंद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर ३ खेळाडूंसाठी भारतीय संघाचं दार खुलं झालं आहे. या संघात सरफराज खानसह, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिलं गेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून सरफराज खान संघात स्थान मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याला संधी मिळत नव्हती. अखेर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान दिलं गेलं आहे. सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

SCROLL FOR NEXT