KKR  
क्रीडा

IPL 2025: आयपीएलआधी मोठा उलटफेर! राजस्थानचा दिग्गज खेळाडू KKR च्या ताफ्यात

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सर्व संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहे. कारण या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतात.

तर दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या आवडत्या संघातून खेळताना दिसून येऊ शकतात. दरम्यान संघातील खेळाडूंमध्ये बदल होण्यापूर्वी कोचिंग स्टाफमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्स संघातील दिग्गज खेळाडू आगामी आयपीएल स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

माध्यमातील वृत्तानुसार राजस्थान रॉयल्स संघातील दिग्गज खेळाडू कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. कुमार संगकाराने २०२१ पासून राजस्थान रॉयल्स संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका बजावली आहे.

मात्र आता त्यांनी या फ्रेंचायझींची साथ सोडण्याचा विचार केला आहे. त्यामुळे इतर फ्रेंचायझी त्याला संपर्क करत आहे. ज्यात केकेआरचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसात, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जर कुमार संगकाराने केकेआरमध्ये प्रवेश केला. तर त्याला मेंटॉरची भूमिका दिली जाऊ शकते.

गंभीरने सोडली केकेआरची साथ

गौतम गंभीरने आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला केकेआरची साथ सोडावी लागली आहे. यासह अभिषेक नायरने देखील केकेआरची साथ सोडली आहे.

केकेआरने आयपीएल २०२४ स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं होतं. फायनलमध्ये या संघाने हैदराबादला पराभूत करत आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. या विजयाचं श्रेय गौतम गंभीरला देखील दिलं गेलं होतं.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT