new zealand yandex
Sports

IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर

Kane Williamson Ruled Out: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ, 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे पुण्यात होणारा दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सन हा फिट नसल्यामुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीही केन विलियम्सन पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे तो संघाबाहेर असणं हा न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत अपडेट दिली आहे. केन विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, ' तो दुखापतीतून सावरत आहे. मात्र तो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना, भारताचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ४०२ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६२ धावा केल्या. यासह न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT