big blow for mumbai indians jason behrendorff ruled out of ipl 2024 luke wood named as replacement  twitter
Sports

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर; रिप्लेसमेंटची घोषणा

Mumbai Indians,IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने देखील सराव करायला सुरुवात केली आहे

Ankush Dhavre

Jason Behrendorff Ruled Out Of IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने देखील सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान स्पर्धेला ३ दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान त्याच्या रिप्लेसमेंटची देखील घोषणा करण्यात आली आहे.

कोणाला मिळालं स्थान?

जेसन बेहरेनडॉर्फ बाहेर झाल्यानंतर मुंबईच्या ताफ्यात आणखी एका घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. मुंबईने ल्यूक वूडला आपल्या संघात स्थान दिलं आहे. त्याला ५० लाख देत संघात स्थान दिलं गेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाकडून खेळणाऱ्या ल्यूक वूडला टी -२० आणि वनडे खेळण्याचा अनुभव आहे. त्याने ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत. यासह २ वनडे सामन्यांमध्ये त्याला १ गडी बाद करता आला आहे.

ल्यूक वूडला आयपीएल खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे हे त्याचं पहिलंच हंगाम असणार आहे. जेसन बेहरेनडॉर्फ संघाबाहेर झाल्याने नक्कीच मुंबई इंडियन्स संघाला धक्का बसला आहे. कारण त्याने गेल्या हंगामातील १४ सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत १२ गडी बाद केले होते. आता ल्यूक वूडला जर संधी मिळाली तर तो संघासाठी कशी कामगिरी करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)

आगामी हंगामासाठी असा आहे मुंबईचा संघ :

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहाल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पियुष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT