KKR saam tv
Sports

KKR, IPL 2025: केकेआरला मोठा धक्का! संघातील सर्वात वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर; रिप्लेसमेंटची घोषणा

Umran Malik Ruled Out IPL 2025: कोलकाता नाईट रायडर्स संघातील वेगवान गोलंदाज आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडूंनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची जागा भरुन काढण्यासाठी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चेतन सकारियाला संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक जम्मू एक्स्प्रेस म्हणून ओळखला जातो. या गोलंदाजाने पहिल्याच हंगामात आपल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. मात्र त्यानंतर फॉर्म आणि दुखापतमुळे त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून चेतन सकारीयाला संधी दिली गेली आहे.

डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज चेतन सकारीयाला भारतीय संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याने २ टी-२० आणि १ वनडे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ७५ लाखांमध्ये आपल्या संघात स्थान दिलं आहे. चेतन सकारीयाला भारताकडून खेळण्याचा अनुभव असला तरीदेखील त्याला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा लिलावात कुठल्याही संघाने बोली लावली नव्हती.

आगामी हंगामासाठी त्याचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आता उमरान मलिक बाहेर झाल्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे.

पहिल्याच सामन्यात भिडणार

आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ गतवर्षीचा विजेता संघ आहे. त्यामुळे यावर्षी या संघाला पहिला सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तर कोलकाताचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT