afghanistan cricket team
afghanistan cricket team google
क्रीडा | T20 WC

IND vs AFG: अफगाणिस्तानला मोठा धक्का! स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून होऊ शकतो बाहेर

Ankush Dhavre

India vs Afghanistan T20I Series:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका ११ ते १७ जानेवारीदरम्यान खेळली जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या मालिकेपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाविरुद्धच्या या मालिकेत राशिद खानच्या खेळण्यावर सस्पेंस आहे. त्याची संघात निवड केली गेली आहे. मात्र तो मैदानात खेळण्यासाठी उतरणार की नाही याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

राशिद खानचं खेळणं कठीण?

टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या १९ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी इब्राहिम जादरानच्या हाती असणार आहे. तर टी-२० संघाचा कर्णधार राशिद खान खेळणार की नाही हे कळू शकलेलं नाही. यामागचं कारण असं की, नुकताच त्याच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Latest sports updates)

अफगाणिस्तानला मोठा धक्का..

नुकताच अफगाणिस्तानचा संघ यूएईविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळून आला आहे. या मालिकेत अफगाणिस्तानने २-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत संघाचं नेतृत्व करणारा जादरान भारतीय संघाविरुद्ध देखील नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मीरवाइज अशरफ म्हणाला की,'आम्हाला ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर जाण्याचा आनंद आहे. भारतीय संघ जगातील टॉप रँकिंग असलेला संघ आहे.'

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ:

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजई,मोहम्मद नबी, करीम जनत, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, केस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेला फटका; लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थाकाजवळ थांबवल्या

Remove Odour From Shoes : पावसाळ्यात तुमच्याही शूजमधून कुबट वास येतोय? तर 'हे' उपाय करा...

Jitendra Awhad News: नागालँड केस संदर्भात आव्हाडांची प्रतिक्रिया!

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

Health Benefits : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

SCROLL FOR NEXT