ben stokes twitter
Sports

Ben Stokes: मुल्तान कसोटी सुरु असताना, इंग्लंडच्या कर्णधाराच्या घरी चोरी; विनंती करत म्हणाला...

Ben Stokes House Theft: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरु असताना, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरी चोरी झाली आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Home Robbery: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला. या मालिकेत पाकिस्तानने बाजी मारली. तर ही संपल्यानंतर मायदेशी परतलेल्या इंग्लंडच्या कर्णधाराला मोठा धक्का बसला आहे. घरी परतताच, त्याला आपल्या घरी चोरी झाली असल्याचं समजलं. ही माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून दिली आहे.

बेन स्टोक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' गुरुवारी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी काही चोरांनी उत्तर पूर्वेतील कॅसल इडन परिसरातील घरात चोरी केली. चोरांनी घरातील मौल्यवान वस्तूंसह दागिने देखील चोरले आहेत. त्याने चोरांना पकडण्याची विनंती देखील केली आहे.

ही घटना त्यावेळी घडली जेव्हा त्याची पत्नी आणि मुलं घरात होती. याबाबत सांगताना तो म्हणाला, ' ही घटना माझी पत्नी आणि २ लहान मुलं घरात असताना घडली. सुदैवाने ते सुखरूप आहेत. मात्र त्यांना मानसिक धक्का बसला आहे.' या पोस्टसह त्याने आपल्या अमूल्य वस्तूंचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे चोरीला गेलेलं सामान परत मिळेल आणि चोर पकडले जातील, असा उल्लेख त्याने पोस्टमध्ये केला आहे.

पोलिसांचे मानले आभार

यादरम्यान बेन स्टोक्सने पोलिसांचे आभार मानले आहेत. यासह त्याने लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले , ' या चोरीबाबत कोणाकडेही काहीही अपडेट असेल किंवा माहिती मिळाल्यास डरहॅम कॉंस्टेबुलेरीला संपर्क करा. पोलिसांचेही खूप खूप आभार. मी पाकिस्तानमध्ये असताना पोलिसांनी माझ्या कुटुंबाची खूप मदत केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT