MS Dhoni  Saam TV
Sports

IPL 2023: धोनीनंतर 'हा' स्टार खेळाडू होणार चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार!

Ben Stokes CSK Captain: पुढील कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना भविष्यातील कर्धणार म्हणून संघातील एका दिग्गज खेळाडूचं नाव समोर येत आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ वेळेस जेतेपद मिळवून दिले आहे.

शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.

त्यानंतर पुढील कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना भविष्यातील कर्धणार म्हणून संघातील एका दिग्गज खेळाडूचं नाव समोर येत आहे.

गतवर्षी जडेजाने केले होते संघाचे नेतृत्व..

गतवर्षी झालेल्या आयपीएल हंगामात रवींद्र जडेजाला चेन्नई संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. ८ पैकी केवळ २ सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवता आला होता.

तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ही कामगिरी पाहता पुन्हा एकदा संघाची जबाबदारी एमएस धोनीकडे सोपवण्यात आली होती. (Latest sports updates)

धोनी नंतर हा खेळाडू होणार संघाचा कर्णधार..

चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसह तो नेतृत्वाची जबाबदारी देखील योग्यरीत्या सांभाळू शकत.

त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लड संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान केवळ ३ वेळेस इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इंग्लंडला २ वेळा जिंकून दिला वर्ल्ड कप..

इंग्लड संघाला २ वेळा वर्ल्ड कप जिंकून देण्यात बेन स्टोक्सने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने २०१९ वनडे वर्ल्ड कप आणि २०२२ टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महत्वाची खेळी करून इंग्लंडला अंतिम सामना जिंकून दिला होता.

आता चेन्नई सुपर किंग्ज संघाला देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन; २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT