eden gardens twitter
क्रीडा

Eden Gardens Stadium: वर्ल्डकप सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना! ईडन गार्डन्स स्टेडियमची भिंत कोसळली; नेमंक काय घडलं?

Ankush Dhavre

Eden Gardens Stadium Wall Collapsed:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील पुढील काही सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर नेदरलँड आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सच्या मैदानावर मोठी दुर्घटना घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार, अर्थ मुव्हिंग मशिनची धडक झाल्याने स्टेडियमच्या बाहेरील बाजूला असलेल्या भिंतीचा काही भाग तुटून पडला आहे. जो भाग तुटून पडला आहे, तो ३ आणि ४ नंबर गेटच्या मधला भाग आहे.

येत्या शनिवारी (२८ ऑक्टोबर) बांगलादेश आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यानंतर मंगळवारी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ याच मैदानावर आमने सामने येणार आहेत.

हा सामना ५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर ११ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचा संघ इंग्लंडसोबत दोन हात करताना दिसून येईल. या वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना देखील याच मैदानावर खेळवला जाणार आहे. (Latest sports updates)

शनिवारी होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ या सामन्यात पराभूत होईल तो संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना देखील पाकिस्तान संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण पाकिस्तानचा संघ अजूनही सेमी फायनलच्या शर्यतीत टिकून आहे. मात्र हा सामना गमावला तर पाकिस्तानचा संघही वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT