IND vs ENG: खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर; BCCI चा मोठा निर्णय  Saam Tv
क्रीडा

IND vs ENG: खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर; BCCI चा मोठा निर्णय

इंग्लंड दौर्‍यावर (IND vs ENG) गेलेला टीम इंडियाचा (Team Inida) खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) हा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positve) आला होता.

वृत्तसंस्था

इंग्लंड दौर्‍यावर (IND vs ENG) गेलेला टीम इंडियाचा (Team Inida) खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) हा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positve) आला होता. तसेच रिद्धिमान साहा, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गारानी (जे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत) संपर्कात आल्यानंतर त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. या दौर्‍यासंदर्भात आता बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता बीसीसीआय भारताकडून कोणताही खेळाडू इंग्लंडला पाठवणार नाही. माध्यमाच्या अहवालानुसार कोणते अतिरिक्त खेळाडू इंग्लंडला पाठवले जातील काय असे विचारले तेव्हा बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका्याने उत्तर दिले "नाही". अभिमन्यू ईश्वरनला संघात संधी मिळेल का असे विचारले असता, अधिकारी म्हणाले याबाबत निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन निर्णय घेतील बीसीसीआय निवडीच्या बाबतीत हस्तक्षेप करत नाही.

दोन्ही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी 10-दिवस विलगिकरणात राहतील आणि लंडनमधील उर्वरित संघ हॉटेलमध्ये त्यांच्या संबंधित खोल्यांमध्ये राहतील. कोविड -19 (COVID-19) परिस्थिती लक्षात घेऊन निवड समितीने इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 20 सदस्यीय संघाची निवड केली होती. भारत आताही कोरोनाच्या बाबतीत रेड झोनमध्ये आहे. म्हणजेच भारतामधून जो कोणी इंग्लंडला जाईल त्याला 14 दिवस विलगिकरणात राहावे लागेल. या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला सर्व राखीव खेळाडूंबरोबर खेळावे लागले. कारण पहिल्या पसंतीच्या अनेक खेळाडू जखमी झाले होते.

इंग्लंडमध्ये कोविड-19 च्या डेल्टा व्हेरियंट प्रसार वेगात होत आहे . भारतीय संघाने COVISHIELD चे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी जोखािम ओढवून घेतली आहे. बुधवारी इंग्लंडमध्ये कोविड-19 चे 42,302 रुग्ण आढळले. विम्बल्डन आणि युरो 2020 चे इंग्लंडने आयोजन केले गेले होते जिथे चाहते विना मास्क दिसले होते. भारतीय खेळाडू 20 दिवसांच्या ब्रेकवर होते आणि ते हे सामने पाहण्यासाठीही गेले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT