virat kohli  Saam TV
Sports

Virat Kohli Fined: गांगुली वादानंतर विराटच्या अडचणीत वाढ! आता BCCI ने केली मोठी कारवाई

Virat Kohli Fined By BCCI: दरम्यान सामन्यानंतर विराटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

RCB VS CSK IPL 2033: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ २२६ धावांचा पाठलाग करत होता. असे वाटत होते की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या धावांचा यशस्वी पाठलाग करणार मात्र शेवटी या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात विराट कोहली अवघ्या ६ धावा करत माघारी परतला. दरम्यान सामन्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर BCCI ने Virat Kohli ला दंड ठोठावला आहे. विराटवर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आयपीएलने आपल्या मीडिया रिलीझमध्ये सांगितले की, विराट कोहलीने (Virat Kohli Fined) बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

कारण अजूनही अस्पष्ट...

आयपीएल आचारसंहितेचा लेव्हल १ च्या नियमांचे उल्लंघन केल्यास, मॅच रेफ्रीने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे खेळाडूला दंड भरावाच लागतो. मात्र दंड का आकारला गेला याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. (Latest sports update)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबे आणि डेवोन कॉनव्हेने अप्रतिम फलंदाजी केली.

शिवम दुबेने या डावात फलंदाजी करताना ५२ तर कॉनव्हेने ८३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर फाफ डू प्लेसिसने ६२ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७२ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT