IPL 2025 MS Dhoni to be Uncapped Player saam tv
Sports

IPL 2025: BCCI ची धोनीवर मेहेरबानी? 'हा' खास नियम केवळ धोनीसाठीच आणला?

IPL 2025 MS Dhoni to be Uncapped Player: धोनी या वर्षी रिटायर होणार का की पुढचा सिझन पण खेळणार, असा प्रश्न धोनीच्या चाहत्यांना नेहमी सतावत असतो. मात्र आता नव्या नियमाचा धोनीला फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे?

Surabhi Jayashree Jagdish

थाला म्हणजेच धोनी यंदाची आयपीएल खेळणार का? असा प्रश्न आयपीएलचा नवा सिझन सुरु होण्यापूर्वी हसखास विचारला जातो. धोनी या वर्षी रिटायर होणार का की पुढचा सिझन पण खेळणार, असा प्रश्न धोनीच्या चाहत्यांना नेहमी सतावत असतो. मात्र यंदाच्या आयपीएलपूर्वी बीसीसीआयने काही नवे नियम जाहीर केले आहेत.

धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार?

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबरी आहे. एम एस धोनी पुन्हा एकदा इंडियन प्रिमीयर लीगमध्ये तुफान आणण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने आयपीएल २०२५ साठी एक जुना नियम काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, धोनी पुन्हा एकदा चेन्नईच्या टीमचा भाग बनणार आहे.

अनकॅप्ड प्लेयर्स रूल पुन्हा लागू

यंदाच्या आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेअर्स नियम पुन्हा लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारा खेळाडू अनकॅप्ड खेळाडू मानला जाणार आहे. मुळात याचा थेट फायदा महेंद्रसिंग धोनीला होणार आहे. जर खेळाडूचा BCCI सोबत केंद्रीय करार नसेल तर तो देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून गणला जाणार आहे. यामुळे एमएस धोनी आता अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत येणार आहे.

धोनीच्या पगारात होणार कपात

या नियमामुळे धोनीच्या पगारात कपात होणार आहे. याचं कारण म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवणार आहे. नवीन नियमांनुसार, प्रत्येक टीम 6 खेळाडूंना कायम ठेवू शकते. ज्यामध्ये 5 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश असणार आहे.

अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जच्या 120 कोटींच्या ऑक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय दुसरीकडे या सिझनसाठी धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेलाय. धोनीच्या नेतृ्त्वाखाली सीएसकेच्या टीमने 5 वेळा (2010, 2011, 2018, 2021 आणि 2023) आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

कशी होती धोनीची आयपीएल सॅलरी

2008 ते 2010: 6 कोटी

2011 ते 2013: 8.28 कोटी

2014 ते 2017: 12.5 कोटी

2018 ते 2021: 15 कोटी

2022 ते 2024: 12 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT