bcci may introduce sarfaraz khan and dhruv jurel in annual central contract list  twitter
Sports

BCCI Annual Contract: सरफराज-ध्रुवचं नशीब फळफळणार!; BCCI कडून लवकरच मिळणार मोठं गिफ्ट

Sarfaraz Khan- Dhruv Jurel: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सरफराज खान,ध्रुव जुरेल आणि आकाश दीपला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे

Ankush Dhavre

BCCI Central Contract, Dhruv Jurel- Sarfaraz Khan:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सरफराज खान,ध्रुव जुरेल आणि आकाश दीपला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. मध्यक्रमात फलंदाजी करणाऱ्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत चांगली कामगिरी केली आहे. नुकताच बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. या यादीत सरफराज खान आणि ध्रुव जुरेलचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान लवकरच या दोघांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत समावेश केला जाणार आहे.

सरफराज आणि ध्रुव जुरेलचा होणार फायदा..

बीसीसीआयच्या नियमानुसार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जे खेळाडू ८ वनडे, ३ कसोटी किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार अशा खेळाडूंचा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत ग्रेड सी मध्ये समावेश केला जाईल.

या मालिकेत पदार्पण करणाऱ्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेलने आतापर्यंत केवळ २-२ सामने खेळले आहेत. धरमशाळा कसोटी सामना हा दोघांच्याही कसोटी कारकिर्दीतील तिसरा सामना असणार आहे. त्यामुळे दोघांचाही ग्रेड सी मध्ये समावेश केला जाऊ शकतो. (Cricket news marathi)

ए प्लसमध्ये या खेळाडूंचा समावेश..

विराट कोहली, जसप्रीत बुमराह रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा

ग्रेड ए

मोहम्मद सिराज, आर अश्विन, मोहम्मद शमी, शुभमन गिल, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या

ग्रेड बी

रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव हे खेळाडू ग्रेड बीमध्ये आहेत.

ग्रेड सीमध्ये या खेळाडूंचा समावेश..

ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रिंकू सिंग, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT