team india twitter
Sports

Team India New Jersey: टीम इंडिया दिसणार नव्या रुपात! भारताची नवी जर्सी पाहिली का?

Team India Jersey Launch: बीसीसीआयने भारतीय वनडे संघासाठी नवीन जर्सी लॉन्च केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय महिला संघ लवकरच नव्या रंगात दिसून येणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) भारतीय वनडे संघाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या हस्ते ही जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सी लॉन्चच्या कार्यक्रमावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ही जर्सी अॅडिडासकडून बनवण्यात आली आहे. भारतीय संघाची यापूर्वीची जर्सी पाहिली, तर ती पूर्णपणे निळ्या रंगाची होती. यासह खांद्यावर ३ पट्ट्या होत्या. वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळी या पट्ट्या तिरंगी रंगात रंगवण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी सुरुवातीपासूनच तिरंगी पट्ट्या आहेत.

ही जर्सी केवळ भारतीय महिला संघासाठी नसून पुरुष संघासाठी देखील असणार आहे. भारतीय महिला संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळताना दिसून येणार आहे.

भारतीय पुरुष संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ फ्रेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा सामना करताना दिसून येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या स्पर्धेतही भारतीय संघ ही जर्सी घालून मैदानात उतरेल.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ५६ सेंकदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जय शहा आणि हरमनप्रीत कौर जर्सी लॉन्च करताना दिसून येत आहेत. लॉन्च केल्यानंतर हरमनप्रीत कौर आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT