BCCI New Rules, Ranji Trophy 2024-25: आजपासून ( ११ ऑक्टोबर) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण ३८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान युवा खेळाडूंसह भारतीय संघातील प्रमुख खेळाडू देखील खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने या स्पर्धेसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांमुळे फलंदाजांच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे.
रणजी ट्रॉफीसाठी बीसीसीआयने नवी नियमावली जाहीर केली आहे. ज्यात पहिला नियम असा की, जर एखादा फलंदाज दुखापतग्रस्त नसेल आणि तो रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला, तर त्याला बाद घोषित करण्यात येईल.
रिटायर्ड हर्ट होऊन गेलेला फलंदाज त्या डावात पुन्हा फलंदाजीला येऊ शकणार नाही. यासह गोलंदाजी करताना कुठल्याही गोलंदाजाने किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडूला थुंकी लावली, तर लगेच चेंडू बदलण्यात येईल. यासह गोलंदाजी करणाऱ्या संघावर पेनल्टी देखील लावली जाईल.
तर आणखी एक नवा नियम म्हणजे, जर एखाद्या फलंदाजाने रन क्रॉस केल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतला आणि ओव्हर थ्रो करताना चेंडू सीमारेषेपार गेला, तर या ४ धावा गृहीत धरल्या जातील.
दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यावेळी ही स्पर्धा २ टप्प्यात होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन २ टप्प्यात केले जाणार आहे. खेळाडूंचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा सुरु असताना, सैय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.