team india
team india  saam tv
क्रीडा | IPL

Emerging Women's Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा! भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख आली समोर

Ankush Dhavre

IND VS PAK ASIA CUP 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धा कुठल्या देशात होणार? हा प्रश्न काही सुटायचं नाव घेत नाही. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचं स्पष्ट मत आहे की, ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर खेळवण्यात यावी. या सर्व चर्चा सुरु असताना बीसीसीआयने वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय अ संघाच्या स्कॉडची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने केली संघाची घोषणा..

शुक्रवारी (२ जून) बीसीसीआयने आगामी वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय अ संघाची घोषणा केली आहे. यादरम्यान त्यांनी १४ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यासह या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे.

बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच संघाच्या कर्णधारांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत. श्वेता सेहरावतला या संघाचे कर्णधारपद तर सौम्या तिवारीला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या दिवशी रंगणार भारत - पाकिस्तान सामना..

या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार असून हे सामने हाँगकाँग मधील टिन क्वांग रोड रिक्रिएशनच्या मैदानावर पार पडणार आहेत. भारतीय महिला अ संघाचा पहिला सामना १३ जून रोजी पार पडणार आहे.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना हाँगकाँग अ संघासोबत होणार आहे. तर पुढील सामना थायलंड अ संघासोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ १७ जून रोजी आमने सामने येणार आहे. (Latest sports updates)

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय महिला अ संघ:

श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी (उपकर्णधार), त्रिशा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, उमा क्षेत्री (यष्टीरक्षक), ममता माडीवाला (यष्टीरक्षक), तीतास संधू, यशश्री एस, काश्वी गौतम , पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT