Lionel Messi: मेस्सीने अश्रू पुसलेल्या त्या टिश्यूची किंमत झाली करोडो रुपये! Saam Tv
क्रीडा

Lionel Messi: मेस्सीने अश्रू पुसलेल्या त्या टिश्यूची किंमत झाली करोडो रुपये!

मेस्सीला बार्सिलोना क्लबला सोडत असताना मात्र अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी मेस्सीच्या पत्नीने त्याला त्याचे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी टिश्यूपेपर दिले होते. याच टिश्यू पेपरची किंमत आता साडेसात कोटी रुपये झाली आहे.

वृत्तसंस्था

Barcelona : दिग्गज फुटबॉल प्लेयर (Football Player) लियोनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांचा प्रवास संपला. तब्बल २१ वर्षांनी मेस्सीने बार्सिलोनाची साथ सोडली. मेस्सीला बार्सिलोना क्लबला सोडत असताना मात्र अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी मेस्सीच्या पत्नीने (Wife) त्याला त्याचे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी टिश्यूपेपर Tissue paper दिले होते. याच टिश्यू पेपरची किंमत आता साडेसात कोटी रुपये झाली आहे. हो हो चक्क साडेसात कोटी रुपये.

Lionel Messi: मेस्सीने अश्रू पुसले त्या टिश्यूची किंमत झाली करोडो रुपये!

पत्रकार परिषदेचं आयोजन करून मेस्सीला निरोप देण्यात आला होता. २१ वर्षांनंतर आपला आणि बार्सिलोनाचा प्रवास संपत असल्याने यावेळी बोलताना मेस्सीला अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी मेस्सीच्या पत्नीने त्याला टिश्यू पेपर दिले आणि मेस्सीने त्याचे डोळे पुसले.

मेसेदुयो नावाचा माणूस मेस्सीच्या अश्रूंमधून जेनेटिक विकत आहे. या व्यक्तीचा असा दावा आहे की मेस्सीच्या आनुवंशिकतेचा देखील या ऊतीमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे लोकांना फुटबॉल खेळाडूचे क्लोन करता येईल.

माहितीनुसार, त्याची पत्रकार परिषद संपल्यानंतर एका व्यक्तीने ते टिश्यू पेपर गोळा केले आणि त्या व्यक्तीने 'त्या' टिश्यू पेपरची ऑनलाईन जाहीरात पोस्ट केली. योग्य ती किंमत आल्यात हा टिश्यू पेपर विकला जाईल, असेही त्या व्यक्तीने त्याने पोस्ट केलेल्या जाहीरातीत म्हटले होते. मेस्सीने अश्रू पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू मर्काडो लिब्रे या वेबसाईटवर चाहत्यांना एक दशलक्ष डॉलर्स अर्थात, सुमारे साडेसात कोटी रुपयांमध्ये मिळू शकतो.


Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

SCROLL FOR NEXT