World Cup Points Table Saam tv news
Sports

World Cup Points Table: बांगलादेश सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर!पाकिस्तानसह या ४ संघांवरही टांगती तलवार

World Cup 2023 Latest Points Table: पाकिस्तानसह या ४ संघांवर टांगती तलवार असणार आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023 Latest Points Table, Semi Final Scenario:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशला १४९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह बांगलादेशचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे. याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.

मात्र या संघाचे टॉप ४ पोहचण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. बांगलादेशने उर्वरित सर्व सामने जिंकले तरी त्यांचे १० गुण होतील. १० गुणांसह बांगलादेशचं सेमीफायनलमध्ये जाणं कठीण आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

भारतीय संघ सध्या १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. बांगलादेशला वगळलं तर उर्वरीत सर्व संघांना १२ गुणांसह सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. दरम्यान अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेदरलँड, इंग्लंड आणि श्रीलंकेला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.

या सर्व संघांकडे जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंत मजल मारण्याची संधी असणार आहे. मात्र एकही सामना गमावला तर सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होऊन जाईल.

भारतीय संघाने या स्पर्धेतील सुरूवातीच्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. १० गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या स्थानी, न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाचे केवळ ४ गुण असले तरीदेखील पुढील सर्व सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. कारण पुढील सर्व सामने जिंकून भारतीय संघ १८ गुणांपर्यंत पोहचू शकतो. (Latest sports updates)

बांगलादेशचा संघ अजुनही होऊ शकतो क्लालिफाय?

केवळ चमत्कारच बांगलादेशला सेमीफायनलमध्ये पोहचवू शकतो. बांगलादेशला अशी प्रार्थना करावी लागेल की, जो चौथ्या क्रमांकाचा संघ असेल तो १० गुणांपेक्षा पुढे जाणार नाही. उर्वरीत ४ सामने बांगलादेशला मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT