bangladesh cricket team  twitter
Sports

ENG VS BAN: बांगलादेशला दुहेरी धक्का! इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर ICC ने केली मोठी कारवाई

Bangladesh Team Fined By ICC: या सामन्यानंतर आयसीसीने बांगलादेश संघावर मोठी कारवाई केली आहे.

Ankush Dhavre

Bangladesh Team Fined By ICC:

वर्ल्डकपच्या सातव्या सामन्यात इंग्लंड आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बांगलादेशला १३७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह गतविजेत्या इंग्लंडने २०२३ वर्ल्डकप स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं आहे.

इंग्लंडसाठी हा पराभव एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. कारण या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दरम्यान या पराभवानंतर बांगलादेशला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे.

आयसीसीने केली मोठी कारवाई..

बांगलादेश विरूद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे बांगलादेश संघावर मॅच फिच्या ५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेश संघाने निर्धाकरीत वेळेपेक्षा एक षटक कमी टाकले होते.

त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेशवर आचारसंहीतेच्या २.२२ नियमानूसार ५ टक्के दंड आकारला गेला आहे. कर्णधार शाकिब अल हसनने ही चूक मान्या केली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सुरूवातीपासूनच या सामन्यात इंग्लंडचा दबदबा पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकअखेर ९ गडी बाद ३६४ धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने १४० धावांची खेळी केली. तर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकं झळकावली. (Latest sports updates)

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी ३६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलदेशचा डाव ४८.२ षटकात २२७ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत २ गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशचा पुढील सामना येत्या १३ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांची तांडा वस्तीत दिवाळी साजरी

सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

आगीचे तांडव! मुंबई, ठाण्यासह राज्यभरात २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात रॉकेटवर बंदी, नवी मुंबईत प्रदूषण वाढले

Weather Update: थंडी आली रे! अखेर राज्यात थंडीची जोरदार चाहूल; निफाडचा पारा घसरला, तुमच्या भागात काय आहे स्थिती?

Monday Horoscope : पैसा येण्याचे मार्ग मोकळे! 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT