team india saam tv
Sports

Axar Patel On WTC Final : WTC जिंकण्यासाठी टीम इंडिया खास प्लॅनसह उतरणार मैदानात; संघातील प्रमुख खेळाडूने केला गौप्यस्फोट

Akshar Patel On Team India Plan: या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूने विजयाचा खास प्लॅन सांगितला आहे.

Ankush Dhavre

Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडला पोहचले असून सराव करायला सुरुवात केली आहे.

न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघाला पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिकंण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूने विजयाचा खास प्लॅन सांगितला आहे.

भारतीय संघातील अष्टपैलु खेळाडू अक्षर पटेलने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की , आयपीएल स्पर्धा सुरु असताना देखील भारतीय खेळाडू लाल चेंडने सराव करत होते. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'आम्हाला आधीच माहित होतं, त्यामुळे आम्ही आयपीएल स्पर्धा सुरु असतानाच लाल चेंडूने सराव करायचो. आमच्याकडे लाल चेंडू उपलब्ध होते, त्यामुळे आम्ही त्यांचा वापज करायचो. आम्हाला माहित आहे, केव्हा, कुठे आणि कधी खेळायचं आहे. टी -२० फॉरमॅट खेळून आल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणं मानसिकरित्या थोडं कठीण आहे. मात्र आमच्याकडे वेळ उपलब्ध आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, 'जे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले नव्हते त्यांना सराव करण्यासाठी जास्त वेळ मिळाला. त्यामुळे मला वाटत नाही की , जास्त अडचण येईल. ड्यूक चेंडूची शाईन जास्त वेळ टिकून राहते. आम्ही देखील ड्यूक चेंडूची ऑर्डर देत, याच चेंडूने सराव केला होता रणनीतीवर काम करणं अधिक गरजेचं असणार आहे. चेंडू कुठलाही असो तुम्ही जर अचूक टप्प्यावर टाकला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. (Latest sports updates)

इंग्लंडच्या वातावरणाबाबत बोलताना तो म्हणाला की, 'आम्ही आताच आयपीएल खेळून आलो आहे. भारतातील वातावरण ४०-४५ डिग्री इतकं होतं.इथे येऊन खूप चांगलं वाटतंय. इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, तर भारतात फिरकी गोलंदाजांची भूमिका अधिक महत्वाची असते. दोन्ही संघासाठी परिस्थिती सामान असणार आहे. इथे हवेत स्विंग मिळतो. जर तुम्ही अचूक टप्प्यावर चेंडू टाकला तर तुम्हाला उसळी देखील मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT