Danielle Collins in Australian Open  Saam Tv
Sports

Australian Open 2022: डॅनियल कॉलिन्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत; बार्टीशी लढत

या स्पर्धेतील डॅनियल कॉलिन्स आणि ऍशले बार्टी यांच्यातील अंतिम लढत चूरशीची हाेईल.

साम न्यूज नेटवर्क

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आज डॅनियल कॉलिन्सने (Danielle Collins) इगा स्विटेकचा (Iga Swiatek) पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. डॅनियलने उपांत्य फेरीत विजय (victory) मिळवून आज तिच्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. डॅनिएलची ऍशले बार्टी (Ashleigh Barty) हिच्या बराेबर अंतिम लढत हाेईल. (Danielle Collins has beaten Iga Swiatek 6-4, 6-1 on Rod Laver Arena, setting up an epic Australian Open final against home favourite Ashleigh Barty)

कॉलिन्सने (australian open) सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. एका निर्णायक क्षणी प्रतिस्पर्ध्याने दुहेरी चूक केल्यावर तिने पहिला गेम जिंकला. सव्‍‌र्हिसवर सतत डळमळीत दिसत असूनही स्विटेकने सामन्यात जाेश आणला. तिने ५-४ अशी बरोबरी साधली आणि कॉलिन्सला सेट सर्व्ह करण्यास भाग पाडले. दुसर्‍या सेटच्या सुरुवातीच्या गेममध्ये कॉलिन्सने पुन्हा नियंत्रण मिळवले.

सामन्यानंतर अंतिम फेरीत पोहोचलाचा आनंद कॉलिन्सच्या चेह-यावर हाेती. ती म्हणाली आजचा प्रवास एका रात्रीत झालेला नाही. लहान असल्यापासून मैदानात कित्येक वर्षे मेहनत आणि तास तास सराव केला आहे. त्याचे हे फळ आहे. माझे बाबा माझ्यासोबत उठून शाळेत जाण्यापुर्वी माझ्यासाेबत सराव करायचे. हे सर्व अमेझिंग आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT