ind vs aus saam tv news
Sports

Australia vs Pakistan: मार्श- वॉर्नरचं वादळ आफ्रिदीने रोखलं! सामना जिंकण्यासाठी ३६८ धावांचं आव्हान

Australia vs Pakistan: या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३६७ धावांचा डोंगर उभारला आहे.

Ankush Dhavre

Australia vs Pakistan:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १८ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटक अखेर ३६७ धावांचा डोंगर उभारला आहे. तर पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३६८ धावांची गरज आहे.

वॉर्नर अन् मार्शची विक्रमी भागीदारी..

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर आली होती. या दोघांनी सुरूवातीपासूनच पाकिस्तानी गोलंजदाजांवर आक्रमण करत हल्लाबोल केला. या दोघांमध्ये २५९ धावांची भागीदारी झाली. ही ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी आहे. तर वर्ल्डकप स्पर्धेत ही पाकिस्तान संघाविरूद्ध केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

या डावात डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूंचा सामना करत १६३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ९ षटकार मारले. तर मिचेल मार्शने १०८ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार मारले. या दोघांना वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

पाकिस्तानचं दमदार कमबॅक..

या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ४०० पेक्षा अधिक धावा करतो की काय असं वाटू लागलं होतं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच कौतुक करावं लागेल. ३४ व्या षटकापर्यंत पाकिस्तानचे गोलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते.

शेवटच्या १४ षटकांमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ५४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. तर हारिस रऊफने ३ आणि उसामा मीरने १ गडी बाद केले. अवघ्या १०० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज माघारी परतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट! विखे पाटलांसह मनोज जरांगेंनाही घेरलं; थेट राजीनामा...

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील अमेझॉन , बिग बास्केट, डार्क स्टोरवर एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT