cricket australia saam tv
Sports

ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर! पण कॅप्टनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Australia Squad For ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान कोणत्या खेळाडूंना स्थान दिलं गेलंय, जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईत खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी रविवारी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला. आता ऑस्ट्रेलियाने तगडा संघ घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय स्क्वाडची जबाबदारी पॅट कमिन्सच्या हाती सोपवण्यात आली आहे. यासह जॅक फ्रेजर , आरोन हार्डी आणि मॅथ्यू शॉर्टला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.

कमिन्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०१७ मध्ये खेळली गेली होती. या स्पर्धेत पाकिस्तानने बाजी मारली होती. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती सोपवण्यात आली आहे. मात्र बॉर्डर -गावसकर मालिकेदरम्यान कमिन्स दुखापतग्रस्त झाला होता .त्यामुळे त्याला संघात तर स्थान मिळालं आहे, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

या स्पर्धेसाठी सर्व संघांना ५ आठवड्यांपूर्वी संघाची यादी पाठवायची आहे. त्यानंतर सर्व संघांना संघात बदल करण्याची अनुमती दिली जाणार आहे. पॅट कमिन्स आता जरी दुखापतग्रस्त असला तरीदेखील, तो जर स्पर्धा सुरु होण्याच्या एक आठवड्याआधी पूर्णपणे फिट झाला, तर त्याला संघात कायम ठेवलं जाऊ शकतं.

मात्र जर असं झालं नाही, तर त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली जाऊ शकते. असं झाल्यास संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अनुभवी खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Squad For ICC Champions Trophy):

पॅट कमिन्स (कर्णधार), अऍलेक्स कॅरी, नाथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रेव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT