AUS W ICC
Sports

AUS W win World Cup: ऑस्ट्रेलियाची हॅटट्रिक; सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव; आफ्रिकेवर १९ धावांनी मात

केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

साम टिव्ही ब्युरो

AUS W win WC Final: महिला टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. (Latest Sports Updates)

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. बेथ मुनीने ५३ चेंडूत ७४ धावांची नाबाद खेळी केली.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावा करता आल्या. एल वोल्वार्डने 48 चेंडूत 61 धावा केल्या. 17व्या षटकात तो बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या.

ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅटट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने 2010, 2012 आणि 2014 मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते.

आता 2018, 2020 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहेत. प्रथमच, एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह ICC स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅटट्रिक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT