asian games 2023 live updates indian womens team won gold in kabaddi by beating Chinese Taipei  twitter
Sports

Asian Games 2023: भारतीय नारींचा एशियन गेम्समध्ये डंका! कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव

Indian Women's Kabaddi Final: भारतीय महिला संघाने दमदार खेळ करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023, India vs Chinese Taipei Kabaddi Final:

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय महिला कबड्डीपटूंनी मैदान मारलं आहे. स्पर्धेतील अंतिम चायनीज ताईपैला धूळ चारत भारतीय महिलांनी सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. हे या स्पर्धेतील भारताचं १०० वं पदक ठरलं आहे. भारतीय संघाने हा सामना २६-२५ ने जिंकला आहे.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटी भारतीय संघाने १ गुणाच्या फरकाने हा सामना जिंकला. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या हाल्फच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघ १४-९ ने आघाडीवर होता.

दुसऱ्या हाल्फमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी भारतीय महिला खेळाडूंनी बाजी मारली आणि २६-२५ ने हा सामना जिंकला.

भारताने आतापर्यंत ९ खेळांमध्ये कमीत-कमी १ सुवर्णपदक पटकावलं आहे. शूटींगमध्ये भारताला ७, अॅथलेटीक्समध्ये ६ तर तिरंदाजीत ५ सुवर्णपदक मिळाले आहेत. तसेच घोडेस्वारी, टेनिस, क्रिकेट,हॉकी आणि कबड्डीत भारताला १-१ सुवर्णपदक मिळालं आहे. (Latest sports updates)

भारताचं पदकांचं शतक पूर्ण..

भारताने शुक्रवारी ९५ पदकांची कमाई केली होती. शनिवारी तिरंदाजीत भारताला ४ पदकं मिळाली. ओजस देवताले आणि सुरेश वेन्नमने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर आदिती स्वामीने कांस्यपदक आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाला गवसणी घातली. कबड्डीत सुवर्णपदकावर नाव कोरताच भारताने पदकांचं शतक पूर्ण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT