team india saam tv
Sports

Asia Cup 2023: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात टीम इंडिया 'या' मजबूत प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात; दिग्गज खेळाडूंचं होणार कमबॅक

Team India Playing 11 For Ind vs Pak Match: जाणून घ्या कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

Indian Team Playing 11 For Match Against Pakistan:

आशिया चषक २०२३ सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरूद्ध नेपाळच्या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर २ सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

दोन्ही संघ बऱ्याच वर्षंनी आमने सामने येणार आहेत. या संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचे मिश्रण पाहायला मिळू शकते.

आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघााकडून कर्णधार रोहित शर्मासह युवा शुबमन गिल डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो.

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर तर ईशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. कमबॅक करत असलेल्या श्रेयस अय्यरला देखील या संघात स्थान दिले जाऊ शकते. तर हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते.

भारतीय संघ मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह फिट होऊन संघात परतला आहे. पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहसह मोहम्मद शमीला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

संघात कमबॅक केल्यानंतर बुमराहने दमदार कामगिरी केली आहे. आयर्लंडविरूद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजासह कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. (Latest sports udates)

पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT