asia cup  saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: BCCI ने विरोध करूनही Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात, पण...

Ankush Dhavre

Asia Cup Fixtures: यावर्षी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) ने गुरुवारी (१५ जुन) रोजी याबाबत घोषणा केली आहे. या स्पर्धचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र यजमान पाकिस्तानला एशियन क्रिकेट काउंसिलने मोठा धक्का दिला आहे. यावेळेस आशिया चषक स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे.

हायब्रिड मॉडेलनुसार केवळ ४ सामने हे पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे यजमान पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तर श्रीलंकेची चांदीच चांदी झाली आहे.

कारण यजमानपद नसताना देखील स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेची सुरुवात ३१ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (Latest sports updates)

एकूण ६ संघांमध्ये रंगणार १३ सामने

आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान संघासह एकूण ६ संघ सहभाग घेणार आहेत. ज्यात अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे.या स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंकेत खेळवला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

यजमान पाकिस्तान संघाला या स्पर्धेतील ४ सामने होस्ट करण्याची संधी मिळणार आहे. तर उर्वरित ९ सामने हे श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ६ संघांची विभागणी २ गटांमध्ये केली जाणार आहे.

या वेळच्या आशिया चषक स्पर्धेचे आयोजन वनडे फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्थान,बांगलादेश आणि नेपाळ या संघांचा समावेश असणार आहे. भारत,नेपाळ आणि पाकिस्तान हे संघ एकाच संघात असणार आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्थान हे एकाच संघात असणार आहे. दोन्ही गटातून २-२ संघ सुपर -४ मध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर सुपर -४ चे सामने राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT