Asia Cup 2022 India vs Pak Ex coach mickey arthur statement Saam Tv
क्रीडा

Ind vs Pak : भारतानं धूळ चारल्यानंतर पाकिस्तान संघात 'भूकंप'; बाबरवरचा विश्वासच उडाला

Nandkumar Joshi

मुंबई : आशिया चषक २०२२ मध्ये भारताची पहिलीच लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पाकिस्तान संघाला रोहित शर्माच्या टीम इंडियानं धूळ चारली. या हायव्होल्टेज आणि अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताकडून (Team India) पाकिस्तानला पाच विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानची आशिया चषक २०२२ या स्पर्धेतील सुरुवातच अत्यंत निराशाजनक झाली. आता भारताकडून झालेल्या पराभवामुळं पाकिस्तान टीममध्ये 'भूकंप'च झाला आहे.

पाकिस्तान संघाची आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातच निराशाजनक झालीय. भारताकडून पाच विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १४७ धावांवर गारद झाला. मागील टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध खेळताना रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीरांनी १५२ धावा केल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रिझवान आणि बाबर ही जोडी हिट असली तरी, या दोघांना सलामीला उतरवायला नकोय, असं आता माजी प्रशिक्षकाला वाटतंय.

पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले की, बाबर-रिझवान या जोडीला सलामीला उतरवण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी योग्य नाही. फखर जमान याला सलामीला पाठवायला हवं. त्यामुळे डावखुरा-उजवा फलंदाज असं कॉम्बिनेशन राहू शकेल. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वेगवेगळ्या अँगलने गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या स्थानी रिझवान किंवा बाबर यापैकी एकाला फलंदाजीसाठी यायला हवं. त्यामुळं फलंदाजी तळापर्यंत भरभक्कम राहील. यातील एकाने महत्वाची भूमिका पार पाडावी आणि उर्वरित खेळाडूंनी त्याला साथ द्यावी.

फखर हा चेंडू वेगवेगळ्या दिशेने टोलवू शकतो. त्यामुळे गोलंदाज त्रस्त होतो, असं मिकी आर्थर यांना वाटतं. पाकिस्तानची मधली फळी ही कमकुवत आहे, असंही मत त्यांनी नोंदवलं. पाकिस्तान संघासोबत असताना टी-२० मध्ये सर्वात यशस्वी संघ होता. आम्ही प्रथम फलंदाजी करताना १६० धावा करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर गोलंदाजांवर सगळी भिस्त असायची. तो काळ आमच्यासाठी खूपच चांगला होता. तेव्हाच्या आणि आताच्या संघात खूपच फरक आहे. त्यावेळी मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक हे होते. आता मधल्या फळीत युवा फलंदाज आहेत. त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे दोन-तीन फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांना धावांसाठी संघर्ष करावा लागतो, असं आर्थर यांनी सांगितलं.

दुसरीकडे भारताकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, पाकिस्तान संघाचं माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक केलं जात आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानात एकमेकांचा सन्मान केला. त्यामुळं भारताकडून पराभव झाला असला तरी, संघावर टीका झाली नाही. आमचा संघ अखेरपर्यंत लढला, असं मोईन खाननं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT