Ashish Nehra Reaction Video x (twitter)
Sports

Ashish Nehra : तो शॉट का मारलास यार.. रुदरफोर्ड कॅचआउट अन् आशिष नेहरा भडकला, Reaction होतेय व्हायरल

Ashish Nehra Reaction Video : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना अहमदाबादमध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

अहमदाबादमध्ये मुंबई आणि गुजरात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने २० ओव्हर्समध्ये १९६ धावा केल्या. या दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना मुंबई आणि गुजरातसाठी महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान हा सामना रंगत असताना गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नेहरा रुदरफोर्डवर रागावत असल्याचे दिसते.

नेमंक काय घडलं?

अठराव्या ओव्हरमध्ये दीपक चहर बॉलिंग करण्यासाठी आला. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर राहुल तेवतिया रनआउट झाला. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर फॉर्ममध्ये असलेला शेरफेन रुदरफोर्ड बाद झाला. रुदरफोर्डची कॅच मिचेल सँटनरने पकडली. तेव्हा आशिष नेहरा जोरात ओरडला. तेव्हाची आशिष नेहराची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गुजरात टायटन्सकडून सलामीला शुबमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. पावरप्ले संपेपर्यंत दोघांनी मिळून ६६ धावा फटकावल्या. शुबमन गिलने ३८ धावा केल्या, तर जॉस बटलरने ३९ धावांचे योगदान दिले. साई सुदर्शनने सर्वोत्तम कामगिरी करत संघासाठी ६३ धावा केल्या. गुजरात टायटन्सने एकूण १९६ धावांचा टप्पा गाठला.

मुंबईची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू

गुजरातची प्लेईंग ११ -

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT