Rohit Sharma IND vs BAN saam tv
Sports

Rohit Sharma: अरे, झोपलेत का सगळे? चेन्नई टेस्टमध्ये भर मैदानात संतापला रोहित शर्मा, पाहा नेमकं काय घडलं?

Rohit Sharma IND vs BAN: भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टेस्टचा तिसरा दिवस आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये चेपॉकमध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाने ५०७ रन्सची आघाडी घेतली आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून या सामन्याला निकाल लागणार हे आता निश्चित झालंय. दरम्यान अशातच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय. यामध्ये रोहित शर्मा टीममधील खेळाडूंवर चांगलाच संतापलेला दिसतोय.

भर मैदानात रोहित शर्मा खेळाडूंवर संपातला

रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये रोहित शर्मा ओरडून, झोपलेत का सगळे असं इतर खेळाडूंना म्हणतोय. यावेळी रोहित शर्मा संतापला असून पुन्हा एकदा खेळाडूंना ओरडतोय. बांगलादेशाच्या फलंदाजीच्या पहिल्या डावाचा हा व्हिडीओ आहे.

रोहित शर्मा फलंदाजीमध्ये फेल

बांगलादेशाविरूद्धच्या टेस्ट सामन्यामध्ये रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्माला पहिल्या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. यावेळी रोहित शर्माने पहिल्या डावात ६ रन्स तर दुसऱ्या डावामध्ये ५ रन्सची खेळी केली. केवळ रोहित शर्मा नाही तर विराट कोहलीला देखील यावेळी साजेसा खेळ करता आला नाही.

ड्रेसिंग रुममधील व्हिडिओही व्हायरल

सोशल मीडियावर ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि शुभमन गिल दिसून येतायत. यावेळी कोच गंभीरच्या मागे रोहित, विराट आणि गिलची मस्ती चालू आहे. यानंतर ते दोघंही खळखळून हसतायत. इतकंच नाही तर गंभीरही नंतर सामील झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रेसिंग रूममध्ये झालेला जोक नक्कीच मोठा असणार, याचं कारण म्हणजे गंभीर अगदी खळखळून हसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT