तिरंदाज दीपिका कुमारी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर Twitter/ @ANI
Sports

तिरंदाज दीपिका कुमारी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर

भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारीने रशियाच्या एलेना ओसीपोवाचा 6-0 असा धुव्वा उडवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिरंदाज दीपिका कुमारीने (Deepika Kumari) सोमवारी वर्ल्ड आर्चरीच्या ताज्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. (World Archery Rankings) या पराक्रमासह तिने गेल्या तीन महिन्यांमधले तिसरे सुवर्णपदक (Gold Medal) मिळवले आहे. रविवारी पॅरिसमधील आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 3 मध्ये तिने सुवर्ण पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि रिकर्व्ह वैयक्तिक स्पर्धा 6-0 ने जिंकली.

भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारीने रशियाच्या एलेना ओसीपोवाचा 6-0 असा धुव्वा उडवला. 2021 मधील दिपिकाचे हे दुसरे वैयक्तिक विश्वचषक पदक आहे. रविवारी महिला मिश्र संघ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले गेले आणि वर्षातील तिसरे सुवर्णपदक पटकावले.

“मी आनंदी आहे, पण त्याच बरोबर मला माझी कामगिरी अशीच पुढे चालू ठेवावी लागेल. मला त्यात सुधारणा करायची आहे, कारण आगामी स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. मला जे काही शक्य आहे ते शिकण्याचा प्रयत्न मी करीत आहे, असे वर्ल्ड आर्चरीच्या अधिकृत संकेतस्थळाशी बोलताना दिपीका कुमारी म्हणाली.

यापूर्वी दीपिका आणि अतानू या जोडीने गॅब्रिएला स्लोएसर आणि स्जेफ व्हॅन डेन बर्ग या डच जोडीचा 5-3 ने पराभव करून प्रथम विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले. भारताच्या दीपिका कुमारी, कोमलिका बारी आणि अंकिता भकत यांचा समावेश असलेल्या महिलांच्या रिकर्व्ह टीमने फ्रेंच राजधानीच्या तिरंदाजी विश्वचषकात तिसर्‍या फेरीत सुवर्णपदक मिळवले. अंतिम सामन्यात या संघाने मेक्सिकोला 5-1 ने पराभूत केले. आगामी स्पर्धा अर्थातच टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT