Kolkata Knight Riders saam tv
Sports

केकेआरला दुहेरी झटका; कमिन्सनंतर आता 'हा' अनुभवी खेळाडू IPL मधून बाहेर

केकेआरला दोन दिग्गज खेळाडूंच्या बाहेर जाण्यामुळं दुहेरी झटका बसला आहे.

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या १५ व्या पर्वात (IPL 2022) अजिंक्यपद मिळवण्यासाठी सर्वच संघ प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. परंतु, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदाच्या मोसमात प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत काही संघांचा पराभव झाला. मात्र, सतत पराभव होऊनही पुन्हा नव्या जोशानं विजयपथावर पोहोचणारा संघ म्हणजे (kolkata Knight riders) कोलकता नाईट रायडर्स. एकीकडे कोलकताचा संघ प्ले ऑफच्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. पण दुसरीकडे मात्र कोलकत्याच्या अडचणीही काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस (Pat Cummins) दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर असतानाच आता आणखी एक अनुभवी खेळाडू आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे केकेआरला दोन दिग्गज खेळाडूंच्या बाहेर जाण्यामुळं दुहेरी झटका बसला आहे.

अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

कोलकता नाईट रायडर्सचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे. अजिंक्य रहाणेकडे १५८ आयपीएलचे सामने खेळल्याचा दांडगा अनुभव आहे. परंतु, रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने तो यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सनरायजर्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात रन काढताना अजिंक्यला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतरही रहाणेने फंलदाजी करणं सुरुच ठेवलं. पण क्षेत्ररक्षणासाठी मात्र रहाणे मैदानात उतरला नाही. रहाणे दुखापतीमुळं कमीत कमी चार आठवडे मैदानापासून दूर राहणार आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यालाही मुकणार

मार्च महिन्यात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खराब फॉर्ममुळं अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड केली नव्हती. मात्र, श्रेयस अय्यरने मिळालेल्या संधीचं सोनं करत श्रीलंके विरोधात मोठी धावसंख्या रचली होती. जुलैमध्ये भारत आणि इंग्लडमध्ये टेस्ट मॅच होणार आहे. या टेस्ट सीरिजमध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे खेळू शकला असता. परंतु, दुखापतीमुळं रहाणे इंग्लंडच्या दौऱ्यालाही मुकणार आहे. १६ जूनच्या आसपास भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha/OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळांची अॅक्शन, थेट फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Weight Loss Tips : हे कडधान्य रोज रात्री भिजवून खा अन् वजन कमी करा

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT