afghanistan twitter
Sports

AFG vs SL: पुण्यात श्रीलंकेला अफगाणी हिसका! स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी २४२ धावांचं आव्हान

Afghanistan vs Srilanka: या सामन्यात श्रीलंकेने २४२ धावांचं आव्हान दिलं आहे.

Ankush Dhavre

Afghanistan vs Srilanka:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३० वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४१ धावा केल्या आहेत .

श्रीलंकेकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी पथुम निसंका आणि दिमुथ करूणारत्ने यांची जोडी मैदानावर आली होती. श्रीलंकेला २२ धावसंख्येवर पहिला धक्का बसला. करूणारत्ने अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार कुसल मेंडिस ३९ आणि सदीरा समरविक्रमा अवघ्या ३६ धावा करत माघारी परतला. श्रीलंकेकडून कुठल्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. ४९.३ षटकअखेर श्रीलंकेला २४१ धावा करता आल्या आहेत. (Latest sports updates)

अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना फारूकीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर त्याने १० षटकात ३४ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर मुजीब उर रहमानने ३८ धावा खर्च करत २ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरायच्या कार्यक्रमात अनुपस्थित

Period Remedies : औषधं घेऊनही काही फरक नाही; 'हे' उपाय करा, २ दिवसांत येईल मासिक पाळी

SCROLL FOR NEXT