abhishek sharma twitter
Sports

Abhishek Sharma Record:मानलं रे भावा!अभिषेक शर्माने आपल्या 'गुरू'चा रेकॉर्ड मोडत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

Abhishek Sharma Breaks Yuvraj Singh Record: भारताचा युवा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगलाही मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा स्टार फलंदाज, अभिषेक शर्मा याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावलं आहे. भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामनांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने ४७ चेंडूंचा सामना करत १०० धावा कुटल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ षटकार खेचले. या शानदार खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह त्याने आपला आवडता खेळाडू युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

अभिषेक शर्मा हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने १०० धावांपैकी ६५ धावा या फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना केल्या. या धावा त्याने २३२ च्या स्ट्राईक रेटने केल्या . यापूर्वी युवराज सिंगने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना ५७ धावा कुतल्या होत्या. या खेळीदरम्यान युवराजने ५ षटकार आणि ४ चौकार मारले होते. मात्र अभिषेक शर्माने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यासह अभिषेक शर्मा भारतीय संघाकडून खेळताना टी -२० सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामनात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर २ गडी बाद २३४ धावा केल्या.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्माने ४७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १०० धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. त्यानंतर रिंकू सिंगने २२ चेंडूत ताबडतोड ४८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १३४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १००० धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

Sanjay Gaikwad: राऊत यांच्या मायचा XXX..., संजय गायकवाड यांची जीभ घसरली

Patan Monsoon Tourism: पावसाळ्यात नटलेलं साताऱ्यातील पाटण; आवर्जून भेट द्यावी अशी पर्यटनस्थळं

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे-अमित शहांची भेट, राऊतांच्या पोटात का दुखतंय?; सामंत भडकले | VIDEO

Train Travel Hacks: लोकल प्रवासात उलटी होत असेल तर लिंबू ठेवा जवळ; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT