एबी डिव्हिलियर्सने (AB DE Villiers) फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक अतिशय छान पोस्ट शेअर केली आहे. दोघांमधील मैत्री सर्वश्रुत आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) दोन्ही दिग्गज खेळाडू एकाच संघाकडून खेळतात. कोहलीसाठी पोस्ट शेअर करताना एबीने लिहिले - हॅप्पी #internationalworldfriendshipday विश्वासू मित्रापेक्षा जगात दुसरे चांगले काही नाही #friendshipday, तर विराट कोहलीनेही यावेळी त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. कोहलीने एबीसाठी लिहिले माझ्या विश्वासू मित्र एबी डिव्हिलियर्सला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा.
दोन्ही खेळाडू एकमेकांना खूप पसंत करतात. ते अनेकदा त्यांच्या मैत्रीबद्दल बोलत असतात. अनेक मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांना आपला आदर्श मानला आहे. विराट आणि एबीची जोडी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलच्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. पण कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलावे लागले. आता त्याचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडूंना पहिल्या टप्प्यातील कामगिरी दुसऱ्या टप्प्यातही सुरू ठेवायची आहे. त्याच वेळी, दोन्ही अनुभवी खेळाडू देखील त्यांच्या संघाला प्रथमच आयपीएलमध्ये विजेता बनवण्याचा प्रयत्न करतील.
काही दिवसांपूर्वीच एबी डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये दोन मुलं दिसत होती. लोकांना वाटले की ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये एबी डिव्हिलियर्सची मुलगी येन्ते आहे. डॅनियलने पोस्ट शेअर केली आणि कॅप्शन लिहिले, "बेबी हग्ज आणि कडल्स फॉर इट्स बेस्ट फ्रेंड".
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.