Aaron Finch retirement Saam Tv
क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अ‍ॅरॉन फिंचची 'या' फॉरमॅटमधून निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

अॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचा शेवटचा वनडे सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अॅरॉन फिंच याची गेल्या काही दिवसापासून खराब खेळी सुरू आहे, तो वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काही दिवसापासून झगडत आहे. या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अॅरॉन फिंचने शनिवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी T20 विश्वचषक 2022 नंतर अॅरोन फिंच टी20 फॉरमॅटलाही अलविदा करणार असल्याचे बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia) सध्या टी-२० विश्वचषकाचा चॅम्पियन आहे. या वर्षी टीम ऑस्ट्रलिया विजेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. T20 विश्वचषक 2022, 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर अॅरॉन फिंच देखील टी-20 फॉरमॅटला अलविदा करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अॅरॉन फिंच 35 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या फॉरमॅटमध्ये त्याला खेळायला संधी देऊ शकते.

गेल्या काही दिवसापूर्वी अॅरॉन फिंचने निवृत्तीचे संकेत दिले होते. अॅरॉन फिंचनेही आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत, अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून (Australia) 145 वनडे आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत. अॅरॉन फिंचने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 92 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये अॅरॉन फिंचने 17 अर्धशतकांसह दोनवेळा शतक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT