सात ICC ट्रॅाफीमध्ये 7 वेगवेगळे विजेते; जाणून घ्या सविस्तर Saam Tv/ @ICC
Sports

सात ICC ट्रॅाफीमध्ये 7 वेगवेगळे विजेते; जाणून घ्या सविस्तर

बुधवारी 23 जून 2021 रोजी न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत करून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुधवारी 23 जून 2021 रोजी न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत करून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Finals 2021) गदेवर आपलं नाव कोरलं. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखालील कीवी संघानं विजेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या संघाने जवळपास दोन दशकांनंतर कोणतीतरी आयसीसी (ICC) स्पर्धा जिंकली आहे. तथापि, शेवटच्या दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

आपल्याला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की सन 2013 ते सन 2021 पर्यंत जेवढ्या आयसीसी स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत, त्या सर्व स्पर्धांमध्ये वेगवेगळे विजेते पाहायला मिळाले आहेत. यामुळे क्रिकेटचा खेळ अधिक स्पर्धात्मक झाला आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांनी या वर्षात आयसीसीचे विजेतेपद जिंकले आहे.

सन 2013 साली बोलायचे झाले तर त्यावर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली गेली आणि त्याचे जेतेपद भारताने जिंकले. त्यानंतर एका वर्षानंतर आयसीसी पुरुषांचा टी -20 वर्ल्ड कप खेळला गेला. 2014 चा आयसीसी विश्वचषक श्रीलंकेच्या संघाने जिंकला होता. त्याच वेळी 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला. 2016 मध्ये पुन्हा टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. हा विश्वचषक वेस्ट इंडीज संघाने जिंकला होता.

2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. त्या स्पर्धेचा विजेता पाकिस्तानचा संघ होता. त्याच वेळी 2019 मध्ये पुन्हा एकदिवसीय विश्वचषक झाला आणि इंग्लंड संघाने ती आयसीसी स्पर्धा जिंकली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 2021 मध्ये खेळला गेला आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत विजेता ठरला. अशाप्रकारे, गेल्या सात आयसीसी स्पर्धांमध्ये सात वेगवेगळे देश विजेते झाले आहेत. अद्याप दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे विजेतेपद जिंकता आले नाही, परंतु दक्षिण आफ्रिकेला 2021 मध्ये टी -20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. अशाप्रकारे आयसीसीच्या 7 स्पर्धांमध्ये जगाला 7 भिन्न विजेते मिळाले आहेत.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT